अमरावतीत पहिल्यांदाच ‘द रनवे सन्सेशन फॅशन शो’चे आयोजन

सण, उत्सव म्हटले की अनेकजण नवनवीन कपड्यांच्या खरेदीला लागतात. नवीन, डिजायनिंग कपड्यांना तरुणपीढी नेहमीच आकर्षित असते. त्यामुळे खादी कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अमरावतीमध्ये प्रथमच फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. दिल्ली, मुंबई या मेट्रोसिटीजसारखे अमरावतीमध्ये आयोजित ‘द रनवे सन्सेशन फॅशन शो’मध्ये अनेक तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला.
खादी कपड्याला विशेष महत्त्व देत अमरावतीत ‘द रनवे सन्सेशन फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विदर्भातील तरुण,-तरुणींनी खादी कपड्यांत रॅम्पवॉक केला. अमरावतीत पहिल्यांदाच झालेल्या फॅशन शोमध्ये विदर्भातील ५३ मॉडल्सनी आनंदाने सहभाग घेतला. खादी कपड्यांना महत्व देत रॅम्पवॉक करत त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
बिडकर अँड डॉटरच्या संचालिका रंजना बिडकर आणि ग्रे रेनबोच्या फॅशन डिझायनर प्रांजली बिडकर यांनी ‘द रनवे सन्सेशन फॅशन शो’चे आयोजन केले. यावेळी शहरातील अनेक तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहयला मिळाले.