Jaimaharashtra news

झारखंडमधील चकमकीत 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान  

झारखंडमधील सिंहभूम येथे नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज म्हणजेच मंगळवारी पहाटे चकमक झाली.

या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे.

सिंहभूम जिल्ह्याच्या खूंटी-चाईबासा सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली.

या भागात सुरक्षा दलांनी नक्षलींविरोधात अभियान राबवले होते. शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला.

सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. तसेच या चकमकीत एकूण 5 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरुन  2 AK47, 2 पिस्तूल आणि एक 303 रायफल असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

Exit mobile version