Tue. Aug 3rd, 2021

धक्कादायक! देवदर्शनकरून गावी परतताना पाच जणांचा मृत्यू

गुलबर्गा येथील आळंदमध्ये देवदर्शनकरून गावी परतताना पाच जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्याचे समजते आहे. हा अपघात झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

नेमकं काय घडलं ?

श्रावणनिमित्त दक्षिण भारतात देवदर्शनासाठी गेले असताना गावी परतताना पाच जणांचा दुर्दैवी अपघात झाल्याची समोर आली आहे.
या अपघातात तिन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हा अपघात गुलबर्गा येथील आळंद येथे घडला आहे.
या अपघातात मृत पावलेले सोलापूर येथील चिंचापूर गावाचे रहिवासी होते.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्याचबरोबर तीन जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *