Mon. Jan 24th, 2022

गोंदियात खोट्या गुन्ह्यात अडकवल्या प्रकरणी पाच पोलीस निलंबित

गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पोलीस ठाण्यात सालेकसायेथील पोलिसांनी बनावट धाड टाकून युवकांना खोट्या प्रकरणात अडकवल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे बनावट धाड टाकण्याचे प्रकरण पोलिसांनाच भोवले आहे.

गोंदिया जिल्हातील नक्षलग्रस्त पोलीस ठाण्यात सालेकसा येथील पोलिसांना बनावट धाड टाकून तीन युवकांना फसवून पैसे उकळल्या प्रकरणात पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अहवालानुसार, याप्रकरणी तपास करून या पाच पोलिसांविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी सहायक पोलिस निरीक्षक अशोक धाबळे, पोलीस नायक प्रमोद सोनवणे, पोलीस नायक अनिल चक्रे, शिपाई संतोष चुटे, शिपाई मधू सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून रक्षकच भक्षक असल्याचा प्रकार घडला असून पोलिसांवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *