Sun. Aug 18th, 2019

ऐन दिवाळीत एअर इंडियाचे कर्मचारी संपावर

0Shares

एअर इंडियाचे तब्बल 400 कर्मचारी बुधवारी (8 नोव्हेंबर) रात्रीपासून संपावर गेले आहेत. या संपामुळे एअर इंडियाच्या 12 उड्डाणांवर परिणाम झाला आहे. अचानक पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 • मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांचं आंदोलन
 • एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्टच्या कर्मचाऱ्यांचा संप
 • प्रलंबित मागण्यासाठी संप
 • ऐन दिवाळीतच कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला

मुंबई विमानतळ विमानतळ विभागातील एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लि. (AIATSL) कंपनीतील कामगारांनी ऐन दिवाळीतच कडकडीत बंद पुकारला आहे.

कामगारांच्या दिर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे तसेच व्यवस्थापनाच्या सततच्या जाचाला कंटाळून हा संप पुकारला आहे. बहुतांश कामगार ह्या संपात ससभागी झाले असून भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस श्री. संतोष चाळके, चिटणीस श्री. संजय कदम व संतोष कदम यांच्या नेतृत्त्वाखाली हा संप पुकारण्यात आला आहे.

या आहेत मागण्या – 

 • बोनस दिला जात नाही
 • वाहतुक सुविधा दिली जात नाही
 • व्यवस्थापनाद्वारे होणारी सततची त्रासदायक व अपमानास्पद वागणूक
 • वर्षानुवर्षे रखडलेली पगारवाढ
 • अवैद्य पद्धतीने कामगारांना कामावरुन काढून टाकणे
 • महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन
 • नविन नियुक्ती न करता निवृत्त झालेल्याच कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाते
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *