Tue. Aug 20th, 2019

अमेरिकेतील अलास्कामध्ये दोन फ्लोट विमानाची हवेत टक्कर

0Shares

दोन फ्लोट विमानाची हवेत टक्कर होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. अमेरिकेतील अलास्कामध्ये हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.तर  एक जण बेपत्ता आहे.  अशी माहीती मिळाली आहे.  यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील  जखमींवर जवळील रूग्णालयात उपचार सुरू असून यातील 4 जण गंभीर जखमी आहेत. फ्लोट विमानामध्ये पर्यटनासाठी आलेले हे पर्यटक असल्याचे सांगण्यात येत आहे.

कसा झाला अपघात?

कून केव जावळ द हेविलेंड डीएचसी-2 बीवर आणि द हेविलँड ऑटर डीसी-3 ही दोन प्लोट विमानांची समोरासमोर टक्कर झालीये.

कून केव जावळ द हेविलेंड डीएचसी-2 बीवर या विमानात 6 प्रवासी प्रवास करत होते.

डीसी-3 ही दोन प्लोट या विमानामध्ये 11 प्रवाशी प्रवास करत होते.

या भीषण अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुर्घटनेवेळी दोन्ही प्लोट विमाने एटीसीच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.तर  एक जण बेपत्ता आहे.

यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत तर यातील 4 जण गंभीर जखमी आहेत.

फ्लोट विमानामध्ये पर्यटनासाठी आलेले हे पर्यटक असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *