Thu. Jul 9th, 2020

पूरग्रस्त शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी द्यावी – शरद पवार

मुसळधार पावसाने राज्यात थैमान घातले असून कोल्हापूर, सांगली भागात धरण सोडल्यामुळे नजीक असलेल्या गावात पाणी शिरलं आहे. यामुळे कोल्हापूर आणि सांगलीकरांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारने 100% कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली आहे.

काय म्हणाले शरद पवार ?

कोल्हापूर, सांगली भागात पूरामुळे मोठा फटका बसला असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे समजते आहे.

या पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत पवरांनी सरकारवर घणघाती टीका केली.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.

ऊस पीक, द्राक्षे आणि डाळींब सारख्या फळ्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे.

या जिल्ह्यांचे नुकसान मी अद्याप पाहिले नसल्याचे शरद पवार म्हणाले.

तसेच पाणी ओसरल्यावर नुकसान किती झाले याचा अंदाज येईल असे स्पष्ट केले आहे.

त्यानंतर नुकसानीचे मोजमाप आणि पंचनामे करावे आणि भरपाई देण्यात यावी असे शरद पवार म्हणाले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *