Fri. Jul 30th, 2021

ऑगस्टमधील महापुरानंतर सांगली, कोल्हापूर भागातील दूध उत्पादन घटलं

2019 च्या ऑगस्ट महिन्यातील महापुरात सांगली जिल्ह्यातील पशुधनाची मोठी हानी झाल्याने सांगली जिल्ह्यात दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटलं आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात 2 लाख लिटरने दूध उत्पादन घटलं आहे. दुग्धविकास अधिकारी अरुण चौगुले यांनी ही माहिती दिलीय.

सांगली जिल्ह्यात तर सुमारे 40 हजार गाई, म्हैशी अशी पाळीव जनावरे असून, महापुरात जनावरांचा मोठ्या प्रमाणावर झालेला मृत्यू आणि चारा टंचाईमुळे दूध उत्पादन घटले. दुधाच्या टंचाईमुळे दूध खरेदी दरात देखील अलीकडच्या 2 महिन्यात वाढ झालीय.

सांगलीच्या नदीकाठच्या भागात ऑगस्टध्ये पुराने उडवलेल्या हाहाकाराची झळ अजूनही दिसून येतेय. जसा या महापुरात माणसांना त्रास झाल त्याहुनही अधिक त्रास मुक्या जनावरांना झाला. पशुधनाचं न भरून येणारे नुकसान या महापुरात झालं.

नदीकाठावरील चार तालुक्यांतच मोठ्या संख्येने दुभती जनावरे व दूध उत्पादनाचा व्यवसाय वाढीस लागला आहे.

या नुकसानीची झळ इतकी बसलीय की पूर ओसरून सहा महिने पूर्ण उलटले तरी पुराचा दुध उत्पादनावर आजही परिणाम दिसून येतोय.

नुसत्या जिल्ह्यात दूध उत्पादन प्रतिदिन तीन लाख लिटरने घटले आहे.

दररोज होणाऱ्या सुमारे 12 लाख लिटर दूध संकलनापैकी 40 टक्के गाईचं दूध आहे.

जिल्ह्यात सरासरी 15 लाख लिटर दैनंदिन दूध संकलन होतं.

पावसाळ्यात दूध संकलनात वाढ होते, मात्र महापुरात पशुधनाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने दूध उत्पादनास फटका बसला आहे.

सांगली जिल्ह्यातील दुधाची वार्षिक संकलन आकडेवारी

एप्रिल 2019 मध्ये दूध संकलनाचा आकडा 13,26,659 इतका होता

ऑगस्टमध्ये पुरानंतर मात्र हा दूध संकलनाचा आकडा 10,37,081 होता.

महापुरानंतर 10 लाखांवर आलेलं दूध संकलन गेल्या पाच महिन्यात 12 लाखांवर आलं. सरासरी दूध उत्पादनात अद्याप 3 लाखांची घट आहे. पुढील सहा महिन्यात दूध उत्पादनात आणखी वाढ होण्याचं शक्यता आहे

कोल्हापूर जिल्ह्यातील दुधाची वार्षिक संकलन आकडेवारी

एप्रिल 2019 मध्ये दूध संकलनाचा आकडा 14,81,528 इतका होता.

ऑगस्टमध्ये हा आकडा 9,97,431 इतक्यावर आलाय.

पुरानंतर जनावरांना चारा मिळाला नाही. चिखलाने माखलेले ऊस, गवत धुऊन जनावरांना चारण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. यामुळे जनावरे कुपोषित झाली, दुभत्या जनावराच्या दुधावर परिणाम झाला. जनावरांच्या गर्भधारणावर परिणाम दिसू लागलाय. नदी काठच्या भागातील अर्थव्यवस्था पूर्णतः दुधावर अवलंबून आहे. या पुराच्या फटक्यामुळे नदी काठची अर्थव्यवस्थाच बिघडून गेलीय. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातवरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *