Mon. Apr 6th, 2020

सांगली, कोल्हापूर मधील पूर परिस्थीती कायम, जिल्ह्याचे मोठे नुकसान

गली कोल्हापूर मधील पूर परिस्थीती अजूनही कायम आहे. जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ज्या गावांत पाणी शिरले त्यातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

सांगली कोल्हापूर मधील पूर परिस्थीती अजूनही कायम आहे. जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ज्या गावांत पाणी शिरले त्यातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाऊसाची संततधार अजूनही सुरूच आहे. आर्मी दाखल,नेव्हीची पथके हेलिकॅप्टरसह आज दाखल होणार आहेत. कोल्हापूरचा चहूबाजूंनी संपर्क तुटला आहे. सध्या महापुरच्या पाणीपातळीत अपेक्षित घट नाहीये.तर महापुरामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झालं आहे.

कोल्हापूरची परिस्थीती गंभीर

कोल्हापूरमध्ये पूर परिस्थीती अजूनही जैसे थे आहे. महापुरच्या पाणीपातळीत अपेक्षित घट झाली नाही. त्यामुळे लोकांचे स्थलांतर करण सुरू आहे. पाऊस कमी झाला असला तरीही धरणातून विसर्ग कमी केला आहे. तरीही एक तासाला फुटाने वाढणारी पाणीपातळी इंचाने कमी होतं आहे.

पंचगंगा नदी अद्यापही 50 फूट 11 इंचावर आहे. दिवसभरात दीड तर तीन दिवसात केवळ साडेचार फुटांची घट होत आहे. त्यामुळे स्थलांतराचे कामही जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. शिरोळ तालुक्यावर बचाव यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे.

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 45 हजार 229 जणांचे स्थलांतर करण्यात आले. या महापुरामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. 67 हजार 984 हेक्टर शेतीच्या नुकसानीचा अंदाज बांधण्यात आला आहे. यामध्ये 3 हजार 669 घरांची पडझड झाली आहे.

अद्यापही जिल्ह्याचा चहूबाजुनी संपर्क बंद आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आज सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुरक्षात्मक चाचणी घेऊन महामार्ग सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू असलेल्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *