Tue. Dec 7th, 2021

महापुरामुळे एस.टी. महामंडळाच्या अनेक फेऱ्या रद्द, कोटींचे नुकसान

पश्चिम महाराष्ट्रात गेले 10 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. मराठवाडा वगळता इतर विभागातील एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. याचा चांगलाच फटका परिवहन मंडळाला बसला आहे.

सांगली कोल्हापूर मधील पूर परिस्थीती अजूनही कायम आहे. जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ज्या गावांत पाणी शिरले त्यातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महापुरामुळे एसटीचे तब्बल १०० कोटींचे नुकसान झालं आहे. एकट्या कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल 50 लाख इतका आहे. गेल्या चार दिवसात एसटीच्या सर्वच फेऱ्या रद्द आहेत.

महापुरामुळे एसटीचे तब्बल 100 कोटीचे नुकसान

पश्चिम महाराष्ट्रात गेले 10 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे पूर परिस्थीती निर्माण झाली आहे. मराठवाडा वगळता इतर विभागातील एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. याचा चांगलाच फटका परिवहन मंडळाला बसला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे रस्ते बंद आहेत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्याही रद्द करण्यात आली आहे. या कारणास्तव एसटीला दररोजचा 4 ते 5 कोटी रुपयाचा महसूल बुडत आहे. गेल्या १० दिवसात 50 कोटी रूपयाचा महसूल बुडाला आहे. अनेक आगार, बसस्थानके, बसेस पाण्यात अडकल्याने स्थावर मालमत्तेचे नूकसान झाले आहेत. यातही 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज बांधण्यात आला आहे.

एसटीचा दररोज 18000 बसेसच्या माध्यमातून 55 लाख किलोमीटर प्रवास पार करत असते. त्यातून सरासरी 22 कोटी रुपयाचं उत्पन्न मिळत असतं. गेल्या १० दिवसापासून दररोज एसटीचे किमान १० लाख किलोमीटरच्या बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे एसटीच्या ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसूल बुडत आहे,

एकट्या कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल 50 लाख इतका आहे. गेल्या चार दिवसापासून १२ आगारातून वाहतूक ठप्प आहे. सांगली, सातारा व कोकणातील काही विभागामध्ये वाहतूक ठप्प आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *