Sat. Jul 2nd, 2022

पुराची पाहणी करतानाचा गिरीश महाजनांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली या भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अनेक राजकीय नेते घटनास्थळी दाखल झाले आहेत. एकीकडे पूरग्रस्तांना मदत मिळत नसताना दुसरीकडे नेते पुराची पाहणी करताना सेल्फी काढत असल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन कोल्हापूरला पुराची पाहणी करत असताना त्यांचा सेल्फी व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

गिरीश महाजनांचा व्हिडीओ व्हायरल –

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरपरिस्थिती असताना नेतेमंडळी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन कोल्हापूरमध्ये पुराची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत.

बचावकार्य करताना गिरीश महाजनांचा एक सेल्फी व्हिडीओ व्हायरल झाला.

या व्हिडीओमध्ये गिरीश महाजन हात हलवताना दिसत असून हसत असल्याचे दिसत असल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

विरोधकांची प्रतिक्रिया –

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी व्हिडीओवर विरोधकांनी टीका केली आहे.

वंबआचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला लोकांचे हाल होण्याशी संबंध नसून ते आपल्या धुंदीत काम करतात.

लोकांच्या जेवणाची सोय झाली नसून नेते पर्यटन करत असल्याचे म्हटलं आहे.

एकही नेते संवेदनशील नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

&

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.