Thu. Aug 11th, 2022

देऊळगाव राजा जवळील आमना नदीला महापूर

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २ दिवसापासून पावसाचा जोर वाढला. देऊळगाव राजा येथे जणू ढगफुटी परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसाने अनेकांची धडकी भरली असून आमना नदीला महापूर आला आहे. अनेक गावांत पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका थेट नागरिकांना बसला आहे. पावसाळ्या पूर्वी नाल्यांची साफसफाई आवश्यक होती मात्र ती न झाल्याने पावसाचे पाणी गावात घुसले आहे. आमना नदीची देखील साफसफाई न झाल्याने हा प्रकार घडला असल्याची ओरड आहे. मात्र मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असून देऊळगाववासी भयभीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.