Wed. May 19th, 2021

फ्लॉवर पार्कने नाशिक बहरलं

आपण आतापर्यंत वॉटर पार्क बघितलं असेल. मात्र नाशिक मध्ये आपल्याला फ्लॉवर पार्क पाहायला मिळणार आहे.

गुलशनाबाद म्हणून नाशिकची पुसली गेलेली ओळख आता पुन्हा एकदा नाशिकला मिळण्याची शक्यता आहे.

उद्योजक शशिकांत जाधव यांच्या संकल्पनेतून हे फ्लॉवर पार्क उभारण्यात आलं आहे. या फ्लॉवर पार्कच उद्घाटन छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं.

या फ्लॉवर पार्कमध्ये दीड लाखाहून अधिक कुंड्या आहेत. हे फ्लॉवर पार्क 8 एकर परिसरात पसरलेलं आहे. देशी तसेच आंतरराष्ट्रीय फुलांचा समावेश या पार्कात आहे.

युरोप, रशिया, फ्रान्स, हॉलंडमध्ये सापडणाऱ्या पिटुनिया, झिनिया, डायनथस, अंथरीयम, कोलयास यापासून ते भारतात असलेल्या सूर्यफूल, बोगणवेलीया, झेंडू, गुलाब, कमळ इथंपर्यंत जवळपास 5 लाख विविधरंगी फुलं या पार्कमध्ये ठेवण्यात आले आहेत.

नाशिककरांना या माध्यमातून जगभरातील फुलं पाहता येतील.

हे पार्क हिवाळ्यातील 4 महिने पर्यटकांसाठी खुलं असणार आहे. या पार्कात प्राण्यांच्या प्रतिकृती तसेच सेल्फी पॉइंट देखील आहे

मोर, गाडी, घर, हार्ट अशा विविध थीमच्या माध्यमातून हे फुलं सजवण्यात आले आहेत.

या व्यतिरिक्त पर्यटकांना या फुलांची इथंभूत माहिती मिळणार आहे. यासाठी अभ्यासू गाईड देखील ठेवण्यात आले आहेत.

या माध्यमातून नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.

पहिल्याच दिवशी फ्लॉवर पार्कमध्ये आलेल्या पर्यटकांना या पार्कमध्ये भुरळ पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *