Tue. Jun 28th, 2022

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. रविवारपासून देशात ३५ हजार ४९९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी देशात ३९ हजार ०७० रुग्णांची नोंद झाली होती, त्यामुळे सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एखूण संख्या३ कोटी १९ लाख ६९ हजार ९५४ झाली आहे. रविवारी देशात ४४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे .
देशात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे .तिसऱ्या लाटेची चाहूल असली तरी रविवारपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. देशात कोरोनाची रुग्णसंख्या ९ टक्क्यांनी कमी झाली आहे.

देशात सध्या कोरोनाचे ४ लाख ०२ हजार १८८ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७.४० टक्के आहे. आतापर्यंत ४ लाख २८ हजार ३०९ रुग्णांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे . आतापर्यंत देशातील ३ कोटी ११ लाख ३९ हजार ४५७ रुग्णांनी विषाणूवर मात केलीये. देशात आतापर्यंत ४८ कोटी १७ लाख ६७ हजार २३२ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत देशातील ५० .६८ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.

देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी ११ लाख ३९ हजार ४५७ झाली आहे. देशाचा रुग्ण बरे होणायचा दर सध्या ९७.४० टक्क्यांवर आहे. तर,आठ्यावड्यचा कोरोना रुग्ण बरे झालेला दर ५ टक्क्यांपेक्षा कमी असून तो २.३५ टक्के आहे. तर, तर रोजचा कोरोना रुग्ण बरे झालेला दर २.५९ टक्के आहे. हा दर गेल्या १४ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.