Mon. Dec 6th, 2021

देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चढउतार

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी २ लाख ३३ हजार १८३ वर गेला आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ९२ लाख ५१ हजार २९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३ लाख ९५ हजार ७५१ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ५ लाख ८६ हजार ४०३ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.शनिवारी कोरोना बाधितांच्या संख्येत दीड हजारांनी वाढ झाली आहे. शनिवारी ५० हजार ४० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार २५८ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या ३२ कोटी १७ लाख ६० हजार ७७ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *