Tue. May 17th, 2022

जयंत पाटील यांच्याकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे लवकरच नथुराम गोडसेट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, त्यांच्या या चित्रपटावरून अमोल कोल्हे यांच्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसेंची भूमिका साकारण्यासाठी राष्ट्रवादीकडून समर्थन करण्यात आले आहे. आणि त्याला काँग्रेसचे समर्थन लाभत आहे. तर शिवसेना मात्र या वादापासून स्वत:ला अलग ठेवू पाहतेय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांच्याकडून कोल्हेंची पाठराखण करण्यात आली आहे.

जयंत पाटील म्हणाले, ‘राष्ट्वादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१७ मध्ये ‘त्या’ सिनेमामध्ये भूमिका केली आहे. त्यामुळे नोटीस काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रवादीत येण्याअगोदरची भूमिका अमोल कोल्हे यांनी केली आहे. मात्र त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होते आहे, हे माहित नाही. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘नथुरामाच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पहा’ – शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंनी साकारलेल्या नथुराम गोडसेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, ‘अमोल कोल्हे यांनी एक कलाकार म्हणून भूमिका साकारली आहे. त्यामुळे नथुरामाच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पहायला हवे’, असे शरद पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले, ‘कलावंत म्हणून मी सर्वच कलाकारांचा सन्मान करतो. याआधी महात्मा गांधी यांच्यावर जो सिनेमा प्रदर्शित झाला होता, त्या सिनेमात कोणीतरी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली होती. ती भूमिका करणारा नथुराम गोडसे नव्हता, तर कलाकार होता. त्यामुळे एखादी भूमिका साकारताना त्याच्याकडे कलाकार म्हणून पाहयला हवे’, अस ते म्हणाले.

1 thought on “जयंत पाटील यांच्याकडून अमोल कोल्हेंची पाठराखण

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.