सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब

गेल्या दोन वर्षांपासून सामान्य नागरिकांना कोरोनाने हैरान केले आहे आणि आता महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वाढलेल्या महागाईमुळे सामान्य नागरीक पुरता वैतागला आहे. ही वाढलेली महागाई पाहता लोकांना या महागाईच्या जगात राहणं कठीण झालं आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, गॅसचे दरही प्रचंड वाढत आहेत. त्याचा परिणाम दुध, भाजीपाला, जीवनाश्यक वस्तूंचे दरही वाढवण्यात होत आहे. मात्र जीवनाश्यक वस्तूंचा भडका उडविणारा महागाईचा आलेख सातत्याने वाढत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत १ टक्क्याने वाढला आहे
आता एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाई देखील वाढली आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महागाई कमी होईल या आशेवर असलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईचा झटका बसत आहे. गेल्या मार्चमध्ये ७.६८ टक्क्यांवरून आता ८.३८ टक्क्यांवर पोहोचली आहे. महागाईने गेल्या आठ वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे. एनएसओने एप्रिलसाठी जाहीर केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकातील महागाईने आठ वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे. एप्रिलमध्ये महागाई ७.७९ टक्क्यांवर पोहोचली होती. या वर्षी मार्चमध्ये महागाईचा दर ६.९५ टक्के होता. तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हा दर ४.२३ टक्के होता.
भोंगे, राजकारण आणि राजकारणी या सर्व विषयांवर सरकारचे पुर्ण लक्ष लागलेलं आहे. कोणीही महागाई या विषयी बोलत नाहीये. वाढती महागाई पाहता सरकार यावर काही लक्ष देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.