Tue. Oct 26th, 2021

भारत चित्रपटासाठी लोकं नवराही सोडू शकतात; मात्र प्रियांकाने चित्रपट सोडला – सलमान खान

काही महिन्यांपूर्वी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास लग्नबंधनात अडकले. या लग्नासाठी प्रियांकाने प्रचंड तयारी केली होती. विशेष म्हणजे भारत या चित्रपटासाठी अभिनेता सलमान खानसोबत महिला मुख्य भूमिकेत प्रियांका चोप्रा झळकणार होती. मात्र लग्नामुळे प्रियांका चोप्राने भारत चित्रपटातून माघार घेतली. भारत चित्रपटाच्या Zinda हे गाणं रिलीझ करताना सलमान खानने प्रियांका चोप्राला टोला लगावला आहे.

काय म्हणाला सलमान खान ?

अभिनेता सलमान खानचा भारत चित्रपट 5 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे Zinda गाणं प्रदर्शित करण्यासाठी सलमान खानने पत्रकार परिषद घेतली.

भारत चित्रपटासाठी लोकं काही करू शकतात, आपल्या नवऱ्यालाही सोडू शकतात.

मात्र प्रियांकाने आपल्या लग्नासाठी, नवऱ्यासाठी भारत चित्रपट सोडला असं सलमान म्हणाला.

तसेच प्रियांकाने ही भूमिका सोडून पत्नीची भूमिका साकरण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय खूप छान असून मलाही तो आवडला.

प्रियांका चोप्रासोबत यापुढेही काम करणार असल्याचे सलमानने स्पष्ट केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *