Wed. Oct 21st, 2020

हॉटेल, लग्न समारंभासाठी किल्ले देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांचा अभ्यास करत किल्ले भाड्याने देण्यास राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंजूरी दिली असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित असलेल्या कुठल्याही किल्ल्यांना भाड्याने देण्यासाठी परनावगी मिळणार नसल्याचे सांगितले आहे. हॉटेल, लग्नसमारंभासाठी किल्ले दिले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित असलेल्या कुठल्याही किल्ल्यांना भाड्याने देण्यासाठी परनावगी मिळणार नसल्याचे सांगितले आहे.

हॉटेल, लग्न समारंभासाठी किल्ले दिले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

पर्यटनासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठ्यांचा इतिहास असलेले कुठल्याही किल्ल्यांना काही केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आमच्या सरकारच्या काळात जेवढा विकास झाला तेवढा यापूर्वी कुठल्याही सरकारने केला नाह, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *