Mon. Dec 6th, 2021

सीमेवर तणाव; अधिवेशन आजच गुंडाळणार ?

सीमेवरील तणावच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातही रेड अलर्ट आहे.

त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज म्हणजेच गुरुवारी, 28 फेब्रुवारी रोजी संपवणार असल्याची शक्यता आहे.

बुधवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांना चिठ्ठी पाठवून सर्वपक्षीय बैठकीबाबत कळविले.

मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनाही विधानभवनात पाचारण करण्यात आले होते.

अधिवेशनाचे काम संपल्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात बैठक झाली.

या बैठकीत अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, एमआयएमचे इम्तियाज जलील आदी उपस्थित होते.

राज्यात हाय अलर्ट आहे. मोठया प्रमाणावर ‘इनपूट’ येत आहेत. त्यामुळे अधिकारी आणि पोलिस बलाचा उपयोग अन्यत्र करावा लागणार आहे.

अधिवेशनासाठी 5 हजार पोलिसांचे बळ वापरले जात आहे.

त्यामुळे सुरक्षेवरचा ताण वाढू शकतो, म्हणून अधिवेशन आज अंतरिम अर्थसंकल्प मंजूर करुन संपवून टाकू, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *