Fri. Sep 30th, 2022

जबरदस्तीने धर्मांतर

अहमदनगर जिल्ह्यात एका हिंदू महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या भारतीय मानवधिकार परिषेदेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी तसेच पीडितेला न्याय मिळावा यासाठी परिषद प्रयत्नशील आहे. ख्रिश्चन धर्मात आपले जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार अहमदनगर जिल्ह्यातील एका पिडीतेने केली होती. त्याची दखल घेत येथील भारतीय मानवाधिकार परिषदेने याची सखोल चौकशी करत पिडीतेला न्याय देण्याची आणि प्रकरणाचा पुनर्तपास करण्याची मागणी केली आहे. यासाठी कर्नाटक, उत्तर प्रदेश राज्यात जसा कठोर कायदा करण्यात आला तसा महाराष्ट्रात तातडीने करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या ब्राम्हणी येथील राहुरी तालुक्यातील या पीडित महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार येथील भारतीय मानवाधिकार परिषदेकडे केल्यानंतर या प्रकरणातील गांभीर्य ओळखून परिषदेने यासाठी सत्याशोधन समिती गठित करून या तक्रारीतील तथ्य जाणून घेतले आणि तेथील पोलिसांनी आणि त्या महिलेवर अत्याचार करणार्‍यांनी बेकायदेशीर कामे केल्याचा आणि मानवी अधिकारांचे घोर उल्लंघन केले असल्याचा निष्कर्ष काढला असल्याची माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत या परिषदेचे संचालक अविनाश मोकाशी यांनी दिली. या वेळी संचालक अविनाश मोकाशी, चिंतन मोकाशी, विधी सल्लागार अ‍ॅड. अमित सोनवणे, सत्यशोधक समितीचे सदस्य अ‍ॅड. अरुण बनकर, प्रिती मोकाशी उपस्थित होते.

सर्व संशयित आरोपी व्यक्ती, संस्था यांची ओळख पटवून त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, बेकायदेशीर रूपांतरणासाठी व्यक्तींचा आणि संस्थांचा गैरवापर केला जात असून, विदेशी निधीबाबत आर्थिक स्त्रोतचा शोध घ्यावा, पीडित महिलेस आर्थिक नुकसान भरपाई देण्यात द्यावी. राज्य सरकारनेही बेकायदेशीर धर्मांतरणावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या प्रकरणाचा तपास करण्याचा तपास अधिकाऱ्यांवर आणि तेथील हे प्रकरण गांभीर्याने न घेण्याऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी अविनाश मोकाशी यांनी केली. कोऱ्या कागदावर या महिलेची स्वाक्षरी घेतली असल्याने ही बाब गंभीर असल्याचे देखील मोकाशी यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.