Fri. Dec 3rd, 2021

भारतीय हवाई दलाचा वैमानिक बेपत्ता – परराष्ट्र मंत्रालय

भारतीय हवाई दलाने मंगळवारी पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांना उद्धवस्त केले आहे. बुधवारी पीओकेमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग २१ विमान कोसळले. मात्र या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं आहे. विमानातील बेपत्ता वैमानिकाचे नाव अभिनंदन असून त्यांचा व्हिडीओही काही वृत्तांनी दाखवला आहे. मात्र हा व्हिडीओ कितपत खरा आहे हे अस्पष्ट आहे.

नेमकं काय घडलं ?

भारतीय हवाई दलाचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले.

या विमानातील वैमानिक बेपत्ता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे,

एका वैमानिकाला जीवंत पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

तसेच पाकिस्तानने दावा केलेल्या बेपत्ता वैमानिकचा व्हिडीओही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केला आहे.

भारतीय हवाई दलाचे अधिकारी आर जी के कपूर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *