Fri. Sep 30th, 2022

आरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी देशाच्या परकीय चलनसाठ्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात ६०० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. आरबीआयने पहिल्यांदाच हा टप्पा ओलांडला आहे. ४ जून रोजी चलनसाठा 6.8 अब्ज डॉलरने वाढून 605 अब्ज डॉलर्सवर गेला असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.

फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मध्यवर्ती बँकेने डॉलर्सची विक्री करून जवळपास 10 अब्ज डॉलर्सची घसरण कमी केली होती.सीडीएसएलच्या आकडेवारीनुसार, या आर्थिक वर्षांमध्ये सुमारे 37 अब्ज डॉलर्सची निव्वळ आवक झाली आणि त्यामध्ये आणखी 400 दशलक्ष डॉलर्सचा निव्वळ प्रवाह जोडण्यात आला.

ब्रिकवर्क्स रेटिंग्सच्या अहवालानुसार, विनिमय दराच्या अस्थिरतेमुळे आरबीआयने अधिक फॉरेक्स हस्तक्षेप करण्याची मागणी केली, ज्यामुळे विदेशी मुद्रासाठा जमा केल्याने आरबीआयला विनिमय दर राखण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.