Thu. Dec 12th, 2019

माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंग प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत!

माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंहनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. रॉबिन सिंग यांनी सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींवर टीका केली आहे. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणांतर्गत Team India चा दोनवेळा World Cup स्पर्धांमधील Semi-Finals मध्ये पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे आताच प्रशिक्षणाच्या रचनेत बदल करणं गरजेचं आहे, असं रॉबिन सिंग यांनी म्हटलंय.

प्रशिक्षकपदाविषयी काय म्हणाला रॉबिन सिंग?

प्रशिक्षकपदासाठी तुमची स्वतःची मानसिक तयारी असावी लागते.

टीम आणि त्यातील खेळाडू ज्या परिस्थितीचा सामना करतात, त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं.

संघासाठी ज्या योजना केल्या जातात त्यामध्येही सहभागी व्हावं लागतं.

हा खेळ तांत्रिकदृष्ट्या समजून घेतला तरच प्रशिक्षकाला हे सर्व करता येऊ शकते, अशा शब्दांत रॉबिन सिंग यांनी रवी शास्त्री यांच्यावर टीका केलीय.

कोण आहे रॉबिन सिंग?

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू

136 One Day सामन्यांत रॉबिनने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

रॉबिन सिंग हे उत्तम क्षेत्ररक्षक होते.

2007-08 मध्ये त्यानं भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद सांभाळलं होतं.

IPL मध्ये त्यानं Mumbai Indiansचं सहाय्यक प्रशिक्षकपदही भूषवलं आहे.

त्यामुळे रॉबिन सिंग टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक आहे. मात्र दुसरीकडे रवी शास्त्री हेच पुन्हा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी असतील, अशी शक्यता वर्वण्यात येतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *