Sat. Jul 11th, 2020

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन झालं आहे. आज दुपारी 12.07 वाजता एम्स रुग्णालयात जेटली यांनी घेतला अखेरचा श्वास 9 ऑगस्टपासून दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

जेटली यांचा जीवनप्रवास

अरुण जेटली यांचा जन्म 28 डिसेंबर 1952 रोजी झाला.

त्यांचं शिक्षण दिल्लीत झालं.

दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून 1974 मध्ये विद्यार्थी नेता म्हणून निवडले गेले.

1974 मध्ये दिल्ली विद्यापीठातून Law विषयात पदवी मिळवून ते आपल्या वडिलांप्रमाणेच ते वकील बनले.

आणीबाणीच्या काळात ते 19 महिने तुरुंगातही होते.

आणीबाणीनंतर अरुण जेटलींनी जन संघात प्रवेश केला.

त्यांनी सुप्रीम कोर्टातही वकिली केली.

1990 मध्ये त्यांना दिल्ली हायकोर्टाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून मान्यता दिली.

1989 मध्ये जेटली अतिरिक्त सॉलिसिटर जनरल झाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीच नव्हे तर जनता दलचे नेते शरद यादव, तसंच काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे आणि यांच्यासाठीही जेटलींनी वकिलीही केली.

बोफोर्स घोटाळा, पेप्सिको विरुद्ध कोकाकोला यांसारखे मोठे खटलेही त्यांनी लढले.

जेटलींनी 2009 मध्ये वकिली थांबवली.

ते राज्यसभेत विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांनी काम करत होते.

अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्येही त्यांनी विविध मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली.

2014 मध्ये ते अमृतसरमधून निवडणूक लढले होते. राज्यसभेवर खासदारही ते झाले.

मोदी सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

मात्र फुप्फुसातील संसर्गामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीपासून ते दूर राहिले तसंच कोणतंही मंत्रीपद स्वीकारलं नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *