Wed. Jan 19th, 2022

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेल की बेल?

  राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. अनिल देशमुख यांची १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने कारवाई करत देशमुखांना करण्यात आली. न्यायालयाने देशमुखांचा जामीन नाकारला असून त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. आज देशमुखांना न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज जेल की बेल? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच न्यायलयात हजर राहण्यापूर्वी वैद्यकिय तपासणीसाठी अनिल देशमुख यांना रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर देशमुखांना सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.

  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांना समन्ससुद्धा बजावले  होते. मात्र देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. आणि अखेर इतके दिवस बेपत्ता असलेले अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. आणि अखेर देशमुखांची कसून चौकशी सक्तवसुली संचालनालयाने देशमुखांना अटक करून त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.

  अनिल देशमुख यांच्या चौकशीदरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये अनिल देशमुख यांच्या २७ कंपन्यांमध्ये व्यवहार झाला असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. आणि याप्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुलगा ऋषिकेश देशमुख यांनासुद्धा समन्स बजावले असल्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *