Jaimaharashtra news

धोनीने पिंपरी-चिंचवडमध्ये घेतले नवे घर

आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी हा रांचीमध्ये कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे कारण धोनी हा बरेचदा सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. धोनी हा पुष्कळ वेळा आयपीएलचे सामने खेळण्याच्या निमित्ताने पुण्यात येत होता. याच काळात महेंद्रसिंह धोनीने गहूंजे क्रिकेट स्टेडियम जवळच असणाऱ्या किवळे परिसरात फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटवर धोनी अनेकदा आल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. धोनी हा या फ्लॅटवर तीन ते चार वेळेस राहण्यास देखील आल्याची माहिती सुद्धा तेथील नागरिकांनी दिली आहे. आता बरेच दिवसांपासून धोनी हा फ्लॅटवर आला नाही. मात्र पुण्यातील धोनीचा फ्लॅट हा आलिशान आहे. तसेच धोनीला क्रिकेट विश्वात स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाते आणि त्याचा वागण्याचा अंदाज हा त्यांच्या चाहत्याना खूप आवडतो. धोनीने फार कमी कालावधीत भारतीयांची मने जिंकली आहे .दरम्यान, विश्वचषक जिंकून प्रत्येक भारतीयांच्या मनावर धोनीने राज्य केलं. त्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. धोनीने क्रिकेट विश्वात भारताला एक नवी ओळख निर्माण करून दिली आहे.

Exit mobile version