Wed. Jun 16th, 2021

मिल्खा सिंग यांची ऑक्सिजन पातळी घटली, ICUत दाखल

चंदीगड : भारताचे माजी स्प्रिंटर मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिल्खा सिंग यांची गुरुवारी ही प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली. त्यामुळे त्यांना ICUत दाखल करण्यात आलं आहे. आठवड्याभरापूर्वीच मिल्खासिंग यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागच्या आठवड्यात ICUत दाखल केल्यानंतर काही दिवसांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांना कोरोना झाल्यामुळे चंदीगड येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यामुळे मोहालीमधील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र, गुरुवारी पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना चंदीगडच्या PGIMER येथील कोविड हॉस्पिटलमधील ICUतं दाखल करण्यात आलं आहे. मिल्खा सिंग यांना सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. तसेच आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रा. अशोक कुमार यांनी ही माहिती दिली की, सुरुवातीला मिल्खा सिंग यांच्या कोरोनाची काही लक्षणं नव्हती. त्यामुळे मिल्खा यांना घरी विलीनीकरणात ठेवण्यात आले होते. मिल्खा सिंग आता सध्या ९१ वर्षाचे आहे. तसेच मिल्खा सिंग यांच्यानंतर त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांनाही कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिल्खा सिंग आणि निर्मल कौर यांच्यावर एकाच रूममध्ये उपचार सुरू होते. मिल्खा सिंग यांनी आशियाई खेळात पाच वेळा सुवर्णपदकाची जिंकले आहे. 1960 मध्ये रोम येथे झालेल्या 40 मीटर शर्यतीत मिल्खा सिंग चौथ्या क्रमांकावर देखील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *