Jaimaharashtra news

सीबीआयच्या संचालकपदी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती

देशातील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या संचालकपदी आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुबोध कुमार जयस्वाल यांची निवड केली आहे. या समितीमध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमना आणि काँग्रेसचे लोकसभेतील सभागृह नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. या समितीने सुबोधकुमार जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुखपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.

जयस्वाल हे महाराष्ट्र केडरचे १९८५ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते सीआयएसएफचे संचालक म्हणून कार्यरत होते. मंत्रिमंडळ नियुक्ती समितीनुसार जयस्वाल हे लवकरच सीबीआयचा पदभार स्वीकारणार आहेत. ऋषी कुमार शुक्ला यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने फेब्रुवारी महिन्यापासून सीबीआयचे संचालकपद रिक्त होते. अतिरिक्त संचालक प्रवीण सिन्हांकडे याचा पदभार देण्य़ात आला होता.

Exit mobile version