Jaimaharashtra news

या.. पाकिस्तानी खेडाळूकडून पंतप्रधान मोदीवर टीका…

देशभरात अनेक ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मोदी सरकारवर टीका केली जातं आहे. यात आणखी एकाची भर पडली आहे. पाकिस्ताचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आफ्रिदीने नागरिकत्व कायद्यावरुन पंतप्रधान मोदींना खडे बोल सुनावले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे पडसाद हे भारताबाहेर देखील उमटतांना दिसत आहे.

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर आसिफ गफूर यांच्या एका ट्विटवर शाहिद आफ्रिदीनं प्रतिक्रिया दिली.या प्रतिक्रियेत त्यानं मोदींची वेळ भरत आलीय, अशी टीका पंतप्रधान मोदीवर केली. यावरच आफ्रिदी थांबला नाही त्यानं म्हटलं.

भारत सरकारने नागरिकत्व कायदा लवकरात लवकर मागे घ्यावा, नाहीतर त्यांना भविष्यात याचं फळ मिळेल’, असं ट्विट शाहिद आफ्रिदीनं केलं आहे. आफ्रिदीच्या या ट्विटवरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी देखील मोदी सरकारवर ट्विटच्या माध्यमातून शरसंधान केलं होतं. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर आफ्रिदीने मोदी सरकारवर टीका केली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचा आवाज दाबून टाकला जात असून निष्पापांना गोळ्या घातल्या जात असल्याचं ट्विट आफ्रिदीने केलं होतं.

या ट्विटमुळे भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं आफ्रिदीच्या वक्तव्याची भारतातून अनेकजणाने आफ्रिदीला ट्विटच्या माध्यामातून चांगलचं सुनावलं होतं.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरनं आफ्रिदीच्या वक्तव्याची खिल्ली उडवली होती.

Exit mobile version