डायनासोर काळातील मादागास्कर बेटांवर fossil fish जिवंत सापडला …

हिंदी महासागरात असलेल्या मादागास्कर बेटांवर शार्क माशाची शिकार करणाऱ्या मच्छीमारांना डायनासोर काळात हजारो वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला (fossil fish) जिवंत मासा सापडला आहे. तसेच या माशाला चार कल्ले आहेत. या माशाची प्रजाती जवळपास 42 कोटी वर्षे जुनी आहे. मादागास्करमध्ये सापडलेली ही प्रजाती कित्येक वर्षे जुनी आहे, असे म्हटले जात आहे. या माशाला 1938 पर्यंत लुप्त झाल्याचे मानले जात होते. या भयावह माशाला Coelacanth नावाने ओळखले जाते. हा मासा सापडल्याने खळबळ उडाली आहे. सांगितले जात आहे की, या माशाला 8 पंख आहेत. तसेच तिच्या शरिरावर विशिष्ट अशी धार बनलेली आहे. मादागास्करमध्ये मोजक्या संख्येने हा मासा राहत आहे. येथील समुद्र या प्रजातीच्या विविध माशांसाठी केंद्र बनला आहे. मादागास्करमध्ये शिकाऱ्यांनी शार्क माशाला पकडण्यासाठी एक खास जाळ्याचा वापर केला होता. त्या जाळ्यामध्ये हा मासा सापडला आहे. हे मच्छीमार शिकारी शार्क माशाचे तेल आणि पंख मिळविण्यासाठी खोलवर समुद्रात जाळे टाकतात. जिथे शार्क मासे एकत्र असतात आणि तिथे त्यांना पकडले जाते. हे जाळे समुद्रात 328 फुट ते 492 फुट आतमध्ये जाऊ शकतात. आता हा मासा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. दक्षिण ऑफ्रिकेच्या जर्नल ऑफ सायन्समध्ये छापून आलेल्या या माशावरील संशोधनात म्हटले आहे की, शार्क माशांच्या शिकारीमुळे Coelacanth माशांच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाला आहे. तसेच 1980 पासून शार्क माशांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे मात्र, तेथील सरकार या माशांच्या शिकारीवर गंभीर दिसत नाहीय.

Exit mobile version