पालघरमध्ये चार AK47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त
तब्बल 13 कोटी 60 लाख 99 हजार 900 रुपयांची अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे.

पालघर पोलिसांनी मुंबई अहमदाबाद हायवेवर चिल्हार फाटा येथे 4 बंदुका, चार एके 47 , जीवंत काडतुसे आणि तब्बल 13 कोटी 60 लाख 99 हजार 900 रुपयांची अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. यादरम्यान दोन आरोपींना अटक केली आहे. निवडणुकीच्या वेळीच असे शस्त्राचे आणि अंमली पदार्थाचा मोठा साठा सापडल्यामुळे पोलिसही चकीत झाले आहे.
शस्त्रसाठा जप्त
रविवारी रात्री सुमारे 7 च्या सुमारास चिल्हार फाटा येथील हिंदुस्थान ढाबा या हॉटेलमध्ये संशयस्पद व्यक्ती दोन मोठ्या गोण्या घेऊन आल्या.
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी त्यांची झडती घेतली असता शस्त्रात्रे आणि अंमली पदार्थाचा साठा त्यांच्याकडून सापडला.
शस्त्रात्रे आणि अंमली पदार्थ विकण्यासाठी काही व्यक्ती येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षकांना आगोदरच माहिती मिळाली होती.
विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून कोर्टाने त्यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून कसून चौकशी करत आहे. हा साठा कोणाला विकण्यासाठी आणला होता. या गोष्टीचा पोलिस तपास करत आहे. त्यासाठी आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आली आहे.
मॅगझीनसह चार एके 47, चार गावठी बंदुका, 63 जीवंत काडतुसे आरोपींकडून जप्त करण्यात आली.