Mon. Dec 6th, 2021

कोरोना विषाणू : हातावर अलगीकरणाचा शिक्का असतानाही चौघांचा रेल्वे प्रवास

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत.

एक्सप्रेस रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र दुसऱ्या ठिकाणी हातावर कोरोना अलगीकरणाचा शिक्का असतानाही रेल्वे प्रवास करणारे ४ जण आढळले आहेत. विशेष म्हणजे हे चारही प्रवाशी परदेशवारी करुन परतले होते.

या ४ जणांना हातावर अलगीकरणाचा शिक्का असल्याने टीसीने पालघर रेल्वे स्थानकात उतरवलं. या चारही प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मात्र कोरोनाचं लक्षण नसल्याने त्यांना आग्रहाखातर गावी जाण्याची परवनगी दिली.

नक्की काय घडलं ?

डाऊन मार्गावरील १२२१६ क्रमांकची गरिबरथ एक्सप्रेसमधील जी-४ आणि जी-५ या बोगीतून हे ४ जणं प्रवास करत होते. हे चारही जणं सुरतला निघाले होते.

प्रवासादरम्यान या चारही जणांच्या हातावर अलगीकरनाचा शिक्का असल्याचं लक्षात आलं. ही माहिती प्रवाशांनी टीसीला दिली. यानंतर टीसीने गाडी पालघरमध्ये थांबवण्या संदर्भातली सूचना केली.

यानंतर रेल्वे प्रशासनाने पालघर रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडी थांबणार आहे. या गाडीत कोरोना संशयित असल्याची घोषणा प्लॅटफॉर्मवर करण्यात आली.

ही घोषणा ऐकल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी एकच धूम ठोकली. या चौघांना रेल्वेतून उतरवण्यात आलं. यानंतर स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं. यांची आरोग्य तपासणी केली. सुदैवाने या चारही जणांमध्ये कोणतीही लक्षणं आढळली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *