Sun. Oct 24th, 2021

भीषण अपघात! धान्याने भरलेला ट्रक उलटला चौघांचा मृत्यू

धान्याने भरलेला ट्रक रस्त्यावरील गटाराचे झाकण तुटल्याने त्यात अडकून पलटी झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.गुरुवारी रात्री विक्रोळी पार्कसाईट परिसरात हा ट्रक पलटी झाला. यामध्ये रस्त्यावर उभे असलेले पाच जण या ट्रकखाली दबले गेले आणि चौघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आठवड्याभरापूर्वी या गटाराचे काम झाले होते आणि हा अपघात झाल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे म्हटले जात आहे.

अपघातचं नेमकं कारण काय?

विक्रोळी पार्कसाईट परिसरात गुरुवारी रात्री धान्याने भरलेला पलटी झाला.

गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास धान्याने भरलेला हा ट्रक जात हा अपघात झाला आहे.

विक्रोळी पार्कसाईट परिसरात ट्रकचं मागील चाक गटाराचं झाकण तोडून आत रुतलं.

ट्रकचं मागील चाक गटारात घुसल्याने ट्रक पलटी झाला आहे.

रस्त्याकडेला उभे असलेले पाच जण या ट्रकखाली दबले गेले.

यामध्ये चार जण चिरडून ठार झाले होते. एक जण गंभीर जखमी आहे.

ट्रक धान्याच्या गोण्यांनी भरलेला असल्याने मदत करण्यास अडथळा निर्माण झाला.

आठवड्याभरापूर्वी या गटाराचे काम झाले होते आणि हा अपघात झाल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *