Mon. Dec 6th, 2021

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक 24 तासांत 4 दहशतवादी ठार

पुलवामा हल्ल्यानंतर सीमेवर सतत चकमकी सुरू आहेत. यामध्ये बऱ्याय दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.गेल्या  24तासात जम्मू-काश्मीरमध्ये  दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात4 चकमकी झाल्या.या चकमकीत आतापर्यंत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

तसेच यामध्ये  चकमकीत भारताचा एक अधिकारी आणि तीन जवान जखमी झाले असल्याचीही माहीती देण्यात आली आहे.बारामुला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. चकमकीत मारला गेलेला अली भाई हा पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 24 तासात चार चकमकी

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या14 तासात दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात ४ चकमकी

शोपियान जिल्ह्यातील इमाम साहबमध्ये चकमक 2 ते 3दहशतवादी लपल्याची माहिती

बांदीपोरामध्ये  चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे दोन दहशतवादी खात्मा

लष्करचा टॉप कमांडर अली भाई याचा खात्मा करण्यात जवानांना यश

बारामुला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

बारामुलाच्या कलंतरा परिसरात दोन दहशतवादी ठार

जवानांच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ले

बारामुलात दहशतवाद्यांनी होळीच्या दिवशी शोधमोहीम सुरू असताना जवानांवर ग्रेनेड हल्ला

सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला

चकमकीदरम्यान जखमी झालेल्या जवानांवर 92 बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

या  हल्ल्यात  एकही भारतीय जवान जखमी झाला नसल्याची  लष्कराकडून माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *