अमरावती हिंसाचार प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखासह चौघांना अटक

त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अमरावती बंदमध्ये सहभागी भाजप नेत्यांना पोलिसांनी अटक केले होते. तसेच या बंदमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे, महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी जिल्हाप्रमुख राजेश वानखडे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह चार शिवसैनिकांना अटक केली आहे.
अमरावती शहरात १२ आणि १३ तारखेला आंदोलनाला हिंसक वळण लागले. तसेच या बंदच्या मोर्च्यामध्ये भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यासह शिवसैनिकांचाही सहभाग होता. या शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी, नारेबाजी आणि चिथावणीखोर भाषणेसुद्धा केली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, महानगर प्रमुख पराग गुडदे यांच्यासह चार शिवसैनिकांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अमरावती दंगलीत शिवसेनेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दंगलीत शिवसेना सहभागी असूनही पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात येत आहे.