Thu. Sep 29th, 2022

एकाच घरातील चार जणांनी गळफास घेत संपवलं आयुष्य

राज्यात आत्महत्येच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान नुकतीच नवी मुंबईमध्ये एकाच घरातील चार व्यक्तींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपू्र्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नवी मुंबईतील तळोजा येथे एकाच घरात कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघटकीस झाली आहे. हे चारही मृतदेह पूर्णतः सडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने अंदाजे 2 महिन्यांपूर्वी या कुटुंबाने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तळोजा सेक्टर 9 येथील शिव कॉर्नर या इमारतीमध्ये हे कुटुंबीय राहत होते. मृतदेह सडल्याचा दुर्गंध देखील इमारतीमध्ये आला नसल्याने घटना समोर येऊ शकली नाही.

परंतु मागील 2 महिन्यांपासून घराचे भाडे दिले नाही व फोन देखील उचलत नसल्याने मूळ घर मालक ज्यावेळी घरी आले. त्यावेळी सदर धक्कादायक घटना समोर आली आहे.

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 35 वर्षीय इसम, 30 वर्षीय महिला, 7 आणि 8 वर्षीय लहान मुलगी आणि मुलगा असल्याचं स्पष्ट झाले आहे. या चारही जणांनी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे.

प्राथमिक दृष्ट्या ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष पोलिस व्यक्त करीत असले तरी सदर घटनेचा सर्व बाजूने तपास करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया उपायुक्त अशोक दुधे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.