अमरावतीच्या संचारबंदीचा चौथा दिवस

संचारबंदीचा आज चौथा दिवस आहे. अचलपूर शहरात रात्री १० वाजेदरम्यान दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधील अचलपूर, परतवाडा शहरात कलम १४४ लागू करण्यात आला असून पोलिसांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत.
बुधवारीही अमरावतीमधील अचलपूर, परतवाडा, कांडली आणि देवमाळी या ठिकाणी संचारबंदी कायम आहे. या संचारबंदीमुळे अमरावतीमधील जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ ते १२ या वेळेत संचारबंदीत शिथिलता देण्याचे आदेश अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी काढले आहेत. त्यामुळे अमरावतीकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
काय आहे प्रकरण?
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री १०च्या सुमारास दुल्ला गेट परिसरातील झेंडा काढल्याच्या वादावरून दोन समुदायात वाद निर्माण झाला. यावेळी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही शहरात परिस्थिती नियंत्रणात आली आहे. या घटनेनंतर येथे पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून पोलिसांची अतिरिक्त तुकडीसुद्धा बोलवण्यात आली आहे. तसेच अमरावती शहरातील काही भागांत संचारबंदीचे आदेश दिले असून आज संचारबंदीचा तीसरा दिवस आहे.