Wed. Jul 28th, 2021

‘कौन बनेगा करोडपती’ शोच्या नावाखाली नाशिकमध्ये महिलेला लाखोंचा गंडा

कौन बनेगा करोडपती शोच्या नावाखाली नाशिकमध्ये एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कौन बनेगा करोडपती शोच्या नावाखाली नाशिकमध्ये एका महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे अनोळखी फोन कॉल्स वर नागरिक विश्वास कसा ठेवतात आणि बळी पडतात हा प्रश्न सद्या उपस्थित होत आहे. 25 लाख रुपयांची लॉटरी तसेच कौन बनेगा करोडपती शोचं तिकीट मिळणार आहे. असे सांगत या महिलेला लुटण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकमध्ये राहणाऱ्या एका महिलेला एक अनोळखी फोन आला. यामध्ये मी कौन बनेगा करोडपती मधून बोलतोय आपल्याला कोण बनेगा करोडपती या शोचं तिकीट लागलं आहे. असं सांगण्यात आलं आहे.

यामध्ये आपल्याला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. असं ही सांगण्यात आलं. हे ऐकल्यावर महिलेला देखील आंनद झाल.

मात्र काही वेळेतच या व्यक्तीने सांगितलं की लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी काही रक्कम तुम्हाला भरावी लागेल.

महिलेने हे ऐकल्यावर त्यांना थोडा वेगळा संशय आला मात्र 25 लाख रुपयांची लॉटरी म्हटल्यावर ती महिला ही बळी पडली.

त्या संशयितांच्या म्हणण्याप्रमाणे दिलेल्या अकौंटस वर महिलेने दहा दिवसात 2 लाख 86 हजार रुपये रक्कम टाकली.

मात्र संशयिताने सांगितल्या प्रमाणे लॉटरीचे पैसे काही मिळाले नाही.आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *