तुळजाभवानी मंदिराच्या बोगस वेबसाईटद्वारे भाविकांची फसवणूक

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या नावे बनावट वेबसाईटद्वारे भाविकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. बोगस साईडद्वारे भाविकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे लुटण्यात आले आहे.
तुळजाभवानी येथे झालेल्या भाविकांच्या फसवणुकीविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार उस्मानाबादचे अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कुलस्वामीनी तुळजाभवानी मंदिर संस्थानाची https://shrituljabhavani.org/ ही अधिकृत वेबसाईट आहे. मात्र अज्ञात नागरिकांनी https://www.tuljabhavani.in/ ही बोगस वेबसाईट सुरू करून भाविकांची लूट करण्यास सुरू केली आहे. या बोगस वेबसाईटच्या जाळ्यात अनेक भाविक फसले असून अनेकांकडून पैशांची लूट करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर ची अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org/ आहे. मात्र कुणी तरी अज्ञात लोकांनी https://www.tuljabhavani.in/ ही वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट सुरु केली आहे