Tue. Dec 7th, 2021

आपण महाराष्ट्राचे राज्यपाल होणार असल्याचं सांगत भाडेकरूने लुटलं घरमालकाला!

आपण महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची थाप मारत एका भामट्याने आपल्या फ्लॅट मालकाला चक्क 4,08, 495 रुपयांचा गंडा घातल्याची घटना पुण्यात घडली आहे. महसूल विभागात ॲडिशनल कमिशनरपदाचा आपण नुकताच राजीनामा दिला आहे. मला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल करणार आहेत, असं या भामट्याने घरमालकाला सांगून लाखों रुपयांनी लुटलं.

काय आहे प्रकरण?

प्रकाश भेंडे यांचा पिंपळे सौदागर येथे विदा हाऊसिंग सोसायटी येथे फ्लॅट आहे.

21 जून 2018 ते 25 जून 2019 या कालावधीत आरोपी सुरेश लोहार त्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता.

आपलं काम पुणे आणि मुंबई येथे सुरू असल्याने पुण्याच्या मध्यवर्ती भागात फ्लॅट हवा आहे, असं सांगत प्रकाश यांचा त्याने विश्वास संपादन केला.

महसूल विभागातून ॲडिशनल कमिशनर या पदाचा राजीनामा मी दिला असून मला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल करणार आहेत, असं प्रकाश यांनी सांगितलं.

सुरेशने प्रकाश यांना डिपॉझिट दिलं नाही.

त्याने घरभाडं, लाईट बिल, गॅस बिलाचे पैसे दिले नाही.

एवढंच नव्हे, तर जाताना फ्लॅटमधील विंडो एसीही काढून नेला.

सुरेश लोहार याने प्रकाश भेंडे यांची एकूण 4,08,495 रुपयांची फसवणूक केली.

प्रकाश दिनकर भेंडे यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने  सुरेश लोहार उर्फ नंदकुमार रंगनाथ कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *