Thu. May 6th, 2021

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विनामूल्य कोविड सेंटरची उभारणी

देशभरात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत.वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुणे शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे.सध्या शहरात आरोग्य सुविधांचा मोठा अभाव आहे.बेड,औषध सुविधा रेमडेसिवीर इंजेक्शन यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहेत. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महापालिकेच्या मदतीने कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील वसतीगृहामध्ये विनामूल्य कोविड सेंटर उभारले आहे.

या कोविड सेंटरमध्ये ४५० खाटांची सुविधा उपलब्ध आहे. या कोविड सेंटरमध्ये ८ डॉक्टर, २५ स्वयंसेवक कार्यकर्ते काम करत आहेत. गुढीपाडव्याला या विनामूल्य कोविड सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *