Sun. Mar 7th, 2021

भारतीयांसाठी आता मलेशियाचा प्रवास स्वस्त, ‘ही’ खास सुविधा

भारतातून मलेशियात प्रवासाला जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. या प्रवाशांसाठी मलेशिया सरकारने आता एक खास सुविधा सुरू केली आहे. आता भारतीय प्रवाशांना मलेशियाचा व्हिसा फ्री मिळणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षात तुम्ही मलेशिया फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर ही इंटरनॅशनल टूर तुम्हाला स्वस्तात करता येऊ शकते.

मलेशियन सरकारने भारतीय पर्यटकांसाठी 15 दिवसांची फ्री व्हिसा पॅालिसी आणली आहे. नवीन पासपोर्ट ऑर्डरद्वारे याची घोषणा करण्यात आली आहे. 26 डिसेंबरला फेडरल गव्हर्नमेंट गॅझेट मध्ये याबद्दल छापून आलं आहे. या Free Visa पॉलिसी बद्दल जाणून घेऊ.

अशी करा नोंदणी-

1- Free Visa मिळवण्यासाठी इलेक्ट्रॅानिक ट्रॅव्हल रजिस्ट्रेशन अॅन्ड इन्फॅारमेशन (Electronic Registration and Information) ENTRI या साईटवर नोंदणी करा.

2- ट्रॅव्हल एजेन्सीमार्फत भारतातील मलेशियन ऑफिसमध्येही नोंदणी करू शकता.

कसा घ्याल योजनेचा लाभ?

1- भारतात नोंदणी झाल्यावर पुढील 3 महिन्यांच्या आत कधीही 15 दिवसांसाठी मलेशियाला जाता येईल.

2- मलेशियाच्या Free visa पॉलिसीनुसार एकदा योजनेचा लाभ घेऊन मलेशिया सोडल्यावर 45 दिवसांनी पुन्हा या योजनेचा लाभ घेता येईल.

कधीपर्यंत असेल ऑफर?

1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यत ही ऑफर असेल.

 मलेशियातून परत मायदेशी परतण्याचं तिकीट मात्र त्याच दिवशी काढावे लागेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *