Fri. Feb 28th, 2020

स्टेशन्सच नव्हे, मुंबई लोकलमध्येही लवकरच Free Wifi!

मुंबईकरांना रेल्वेसंदर्भात लोकल वारी आता अधिक सुखकर होणार आहे. कारण आता प्रवास करताना तुमच्या ट्रेनमध्येही Free wifi सुरू होणार आहे. मध्य रेल्वेमध्ये आता केवळ रेल्वे स्टेशन्सवरच नव्हे, तर लोकल ट्रेनमध्येही free wifi सुरू होणार आहेत. येत्या जुलैपासून ही सेवा लोकांसाठी सुरू होणार आहे.

 

मुंबईकर चाकरमान्यांच्या  दिवसातल्या चोवीस तासांपैकी बहुतांश वेळ हा रेल्वे प्रवासातच जातो.

त्यातून मध्य रेल्वेच्या बाबतीत ट्रेनला उशीर होणं, लोकलसेवा विस्कळीत होणं या गोष्टी सातत्याने होत असतात.

मात्र आता प्रवासात विरंगुळा म्हणून प्रवाशांना फ्री नेटसर्फिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मुंबई उपनगरांच्या रेल्वेच्या स्टेशन्सवर free wifi यंत्रणा आहेच.

पण आता लोकल ट्रेनमध्येही प्रवाशांना hotspot मिळणार आहे.

त्यामुळे आता प्रवासादरम्यान मोफत नेटसर्फिंग करणं प्रवाशांना शक्य होणार आहे.

कामावर जाताना किंवा  घरी परतताना आपल्या मोबाइलवर क्रिकेट, वेबसीरिज, मुव्हीज आता फ्रीमध्ये आणि विनाअडथळा enjoy करता येणार आहे.

लोकलमध्येच free wifi असल्यामुळे नेटपॅक नसतानाही नेट अ ॅक्सेस करणं शक्य होणार आहे.

या सोयीचा लाभ घेण्यासाठी आधी आपल्या मोबाईलमध्ये एक अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे.

त्यानंतर या नेटचा वापर करणं शक्य होईल.

या संबंधी कुर्ला स्टेशनवर प्रयोग करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे अधिका-यांकडून मिळाली आहे.

येत्या जुलैपर्यंत ही सेवा वापरता येणार आहे.

प्रवास खर्चातून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त आणखीन उत्पन्न वाढवण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *