Sat. Jul 2nd, 2022

भाजप नेत्याच्या दोन पत्नींमध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

यवतमाळ येथील पांढरकवडा येथे भाजप नेत्याच्या दोन पत्नींमध्ये हाणामारी करत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. राजू तोडसाम असे या भाजप नेत्याचे नाव असून ते यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे आमदार आहेत. विशेष म्हणजे यावेळी राजू तोडसाम यांचा वाढदिवस होता. हा प्रकार मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास वाय पॉईंटच्या जलपर्णी हॉटेलसमोर घडला. या हाणमारीचा व्हिडीओ जिल्ह्यात चांगलाच व्हायरल झाला आहे. या वादानंतर राजू तोडसाम यांच्यावर हिंदु विवाह कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं ?

पांढरकवडा येथील भाजप नेत्याच्या दोन पत्नींमध्ये हाणामारी झाली.

नेत्याच्या एका पत्नीने दुसऱ्या पत्नीला चप्पलेचा चोप दिला.

दुसऱ्या पत्नीसोबत असलेल्या चार ते पाच महिलांनीही तिला मारहाण केली.

या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

हाणामारी झाल्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं.

मात्र, नेत्यासह कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानं तक्रार दाखल झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.