Wed. Oct 5th, 2022

पेट्रोल-डिझेलनंतर आता ऐशोआरामाच्या ‘या’ वस्तूही महागणार

आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे, अशातच महागाईचा आणखी भर पडला आहे.

या महागाईमुळे आधीच सर्व सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागली आहे, त्यातचं आता ऐशोआरामाच्या वस्तूही महागणार आहेत.

म्हणजेच महागाईचा आणखी एक फटका सर्व सामान्य नागरिकांना बसणार आहे.

केंद्र सरकारने 19 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये विमान इंधन, वातानुकूलन यंत्रणा म्हणजेच एसी, वॉशिंग मशिन आणि फ्रीजचा समावेश आहे.

हा निर्णय मध्यरात्रीपासून लागू झाला आहे, त्यामुळे या वस्तूंच्या किमती आता महागण्याची चिन्हे आहेत. डॉलरच्या तूलनेत रुपयांची होत असलेली पडझड बघता, चालू खात्यावरील तूट आणि भांडवली निधीचा देशातून बाहेर चाललेला ओघ कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलं आहे.

त्यामुळे अत्यावश्‍यक गरजेच्या नसलेल्या वस्तूंच्या आयातीवर निर्बंध आणले आहेत, गेल्या आर्थिक वर्षात या 19 वस्तूंची आयात 86 हजार कोटी रुपयांची होती.

कोणकोणत्या वस्तू महागणार आहेत

  • विमान इंधन वाढणार, म्हणजे विमान प्रवास महागणार
  • वातानुकूलन यंत्रणा (एसी)
  • वॉशिंग मशिन
  • फ्रीज, स्पीकर्स आणि फूटवेअर
  • रॅडियल कार टायर, हिरे (सेमी पॉलीश), पॉलिश रत्ने आणि खडे
  • किचनवेअर, टेबलवेअर प्लास्टिक वस्तू
  • सुटकेस, ब्रिफकेस, ट्रॅव्हल बॅग

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.