Wed. Jun 23rd, 2021

पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राकडून मित्राची हत्या

नांदेड : पत्नीसोबत अनैतिक संबंधांच्या संशयावरून मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. तुषार पवार असे मृताचे नाव आहे. मृत तुषारचा मृतदेह काकांडी शिवारात पोत्यात आढळून आला. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी तुषारचा मित्र आणि नातेवाईक असलेल्या मारेकऱ्यास ४८ तासात जेरबंद केले.

तुषार पवार हा युवक शिक्षणानिमित्त नांदेडच्या श्रीनगर भागात राहत होता. तुषार 7 डिसेंबरला रात्री घरी पोहचला नाही. त्यामुळे तुषारच्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबतची तक्रार 8 डिसेंबरला नोंदवली.

तक्रारीनंतर पोलिसांनी शोधाशोध सुरु केली. तपासादरम्यान तुषारचा मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे पोलिसांने समजले. यानंतर पोलिसांनी तुषारच्या मोबाईलच्या अखेरच्या लोकेशनची माहिती घेण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यानंतर दिलीपने मेटकरने टाळाटाळ केली. यामुळे पोलिसांनी याबाबत अधिक तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तुषारच्या मोबाईलच्या अखेरच्या लोकेशनच्या ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली. या ठिकाणी असलेल्या काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्या. याच सीसीटीव्ही फुटेजमुळे या सर्व प्रकरण उघडकीस आले.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बाईकवरुन पांढऱ्या पोत्यात घेऊन जात असताना दिसून आले. या संशयावरुन पोलिसांनी दिलीपला चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले. या चौकशी दरम्यान दिलीपने तुषारची हत्या केल्याचे कबुल केले.

तुषारचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरला. यानंतर मित्र विजय जाधवच्या मदतीने बाईकवरुन काकांडीच्या शिवारात फेकला. अशी माहिती दिलीपने पोलिस चौकशीदरम्यान दिली.

म्हणून केली हत्या

माझे नुकतेच लग्न झालेले. माझ्या पत्नीसोबत तुषारचे संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच मी तुषारला ठार केले, अशी कबुली दिलीपने दिली.

दिलीप मिटकर आणि विजय जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली असून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *