Sat. Jul 31st, 2021

पेट्रोल, डिझेलचे दर आणखी भडकले

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ झालीय पेट्रोल 31 पैशांनी तर डिझेलच्या दरात 58 पैशांनी वाढ झाली आहे.

मुंबईत आता पेट्रोलचे दर 86.26 रुपये तर डिझेलचे दर ७५.१२ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. गेल्या आठवडाभरात झालेली ही तिसरी इंधन दरवाढ आहे.

रूपयाच्या घसरगुंडीमुळे इंधनदरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत पेट्रोलवर सर्वात जास्त म्हणजे ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर घेतला जातो. त्यामुळे मुंबईतील इंधनाचे दर अन्य शहरांपेक्षा जास्त आहेत.

मुंबईत पेट्रोलवर सर्वात जास्त म्हणजे ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) घेतला जातो. त्यामुळे मुंबईतील इंधनाचे दर अन्य शहरांपेक्षा जास्त आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *