Tue. Jun 28th, 2022

पंधरा ऑगस्टपासून मुंबई लोकल प्रवास सुरु

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी रेल्वे लोकलसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. १५ ऑगस्टपासून सर्वसामांन्यासाठी रेल्वे ट्रॅकवर येणार आहे. मात्र कोरोना लसीचा दुसरा डोस घेऊन १५ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकलने प्रवास करता येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

लोकल सेवा सुरु करावी, यासाठी भाजपने आंदोलन केलं होतं. त्याचप्रमाणे अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी विनंती केली होती. त्यामुळे काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासासाठी मान्यता दिली आहे.

मात्र गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारकडून एक सिस्टम तयार करण्यात आली आहे. त्यानुसार ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्या प्रवाशांना मोबाईल ऍपच्या मदतीने रेल्वे पास डाऊनलोड करता येणार आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांना शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमधून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेता येणार आहेत. या पासेसवरील क्यू आर कोडमुळे रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येणार आहे.

कसा मिळवाल रेल्वे लोकलचा पास?

  • लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार
  • दुसऱ्या डोसनंतर १४ दिवसांचा कालावधी अनिवार्य आहे, त्यानंतरच प्रवासाला परवानगी देण्यात येणार
  • स्मार्टफोनवर रेल्वे पास डाऊनलोड करण्याची सोय
  • स्मार्टफोन नसल्यास प्रभाग कार्यालये, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर फोटो पासेस
  • पासवरील क्यूआर कोडमुळे अधिकृतता कळणार

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.