Fri. Sep 30th, 2022

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर अंतिम संस्कार

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर मंगळवारी अंतिम संस्कार झाले आहेत. शुक्रवारी भाषण देताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. त्यामुळे रक्तस्राव झाल्याने त्यांचं निधन झाले होते भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३०. वाजल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवारी निधन झाले . शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी प्राणघातक हल्ला झाला होता, भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, यात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

शिंजो आबे यांच्या छातीजवळ गोळी लागली होती, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला झाल्यानंतर शिंजो आबे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जखम झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता.परंतु २ तासांनंतर त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण जपान हादरले होते . आबे हे आतापर्यंत सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले जपानचे पहिले आणि एकमेव पंतप्रधान होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी वर्ष २०२० मध्ये जपानच्या पंतप्रधानपदाचे राजीनामा दिला होता.

भारतात राष्ट्रीय दुखवटा
शिंजो आबे यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात राष्ट्रीय दुखवटा म्हणून जाहीर केला होता

आतापर्यंत आबे यांनी ५ वेळा भारताला भेट दिली होती. भारताला एवढ्या वेळा भेट देणारे ते पहिले जपानी पंतप्रधान होते. पंतप्रधान मोदी यांच्या समवेत त्यांनी वाराणसी येथे गंगानदीच्या किनारी होणार्‍या गंगानदीच्या आरतीलाही उपस्थिती दर्शवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.